".तर भारतामुळे आशिया कप पुढं ढकलला जाईल"

Sunday, 28 Feb, 9.36 pm

लाहोर | भारतात यावर्षी जूनमध्ये होणारा आशिया चषक पुढे ढकलला जाऊ शकतो, असं भकित पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख एहसान मणी यांनी वर्तवलं आहे. भारत वर्ल्ड कसो़टी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला तर आशिया चषक पुढे ढकलण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. खरंतर, आशिया चषक गेल्या वर्षी खेळवला जाणार होता, परंतु कोरोनामुळे सर्वच स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता विश्व कसोटी चॅम्पियनशिपची फायनल जूनमध्ये होणार आहे.

श्रीलंकेने जूनमध्ये आशिया चषक खेळु शकतो असं सांगितलं आहे. मात्र आशिया कप आणि विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या तारखा एकत्र आल्यामुळे आशिया चषक 2023 पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो, असंही मणी यांनी सांगतिल आहे.