तृणमूल कार्यकर्त्यांनी माझ्या वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी मारले, भाजप कार्यकर्त्याचा आरोप

Sunday, 28 Feb, 9.21 pm

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर तेथील भाजप तृणमूलमधील संघर्ष अधिक वाढला आहे. उत्तर डमडम जिल्ह्यातील एक भाजप कार्यकर्ता गोपाल मजुमदार याने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर त्याच्या वृद्ध आईला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्या वृद्ध महिलेचा मारहाणीनंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिचा संपूर्ण चेहरा लाल पडला असून सुजलेला आहे.

या प्रकरणी गोपाल मजुमदार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 'शुक्रवारी रात्री काही गुंड माझ्या घरात घुसले व त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. ते मला भाजपला का पाठिंबा देतोयस असा सवाल करत होते.