समुद्रकिनारी किसिंग करत होते गे कपल, पोलिसांनी घेतले ताब्यात; पाहा व्हिडीओ

Sunday, 28 Feb, 8.57 pm

समुद्रकिनारी सार्वजनिक ठिकाणी सर्वांदेखत किसिंग करणाऱ्या एका गे कपलला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस त्या दोघांनाही समुद्र किनाऱ्यावरून बाहेर काढत होते मात्र आजुबाजुच्या लोकांनी पोलिसांना याबाबत जाब विचारून भांबावून सोडले त्यामुळे पोलिसांना त्या दोघांना सोडून द्यावे लागले. मेक्सिकोमधील क्विनटाना रु राज्यातील तुलुम शहरात ही घटना घडली आहे.

शनिवारी तुलुम शहरातील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी दोन गे तरुण किस करत होते. मात्र सार्वजनिक ठिकाणी अश्लील प्रकार केला म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले मात्र त्यांना तेथून घेऊन जात असताना त्या तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.