तुरुंगात असलेल्या बांगलादेशी लेखकाचा मृत्यू

Sunday, 28 Feb, 9.24 pm

ढाका - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर करोनाच्या साथीदरम्यान गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराचे आरोप केल्याबद्दल तुरुंगात असलेल्या मुश्‍ताक अहमद या लेखकाचा तुरुंगातच मृत्यू झाला आहे. अहमद यांच्यासह 11 जणांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामी केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी तुरुंगात टाकण्यात आले होते.

कोविड-19 च्या साथीला नियंत्रणात आणण्याऐवजी पंतप्रधान शेख हसिना यांनी गैरव्यवस्थापनच केले असल्याची टीका मुश्‍ताक अहमद यांनी काही व्यंगचित्रांच्या माध्यमातून केली होती. त्यांनी पंतप्रधान हसिना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. या प्रकरणी अहमद यांच्यावर बांगलादेशातील 2018 सालच्या डिजीटल सिक्‍युरिटी ऍक्‍टखाली खटला चालवला गेला.